tikayan

Thursday, October 12, 2006

'नॉटीचरामि'

या पुस्तकाचं नाव खरं तर 'नॉटीचरामि' असायला हवं होतं! अशी पुस्तके वाचून आपण आपला वेळ वाया घालवू नये असं वाटलं. मराठीत अजून खूप चांगली पुस्तके आहेत. जरा बर्‍यापैंकी शैली व तंत्र आणि कमालीचा बोल्डनेस (तेही एका स्त्रीने लिहीलंय म्हणून) यापलिकडे काय आहे या पुस्तकात वाचण्यासारखं? एखाद्या गोष्टीवर कुठलीही भूमिका न घेता त्या अनुषंगाने येणारे सर्व विचार उलगडून दाखवणे हे खासच. पण 'कसं सांगितलंय' च्या झाकोळीत 'काय सांगितलंय' कडे पहायला नको का?एके ठिकाणी बाई म्हणतात की जगात महान कामं केलेल्या बायका बहुतांश घटस्पोटिता आहेत. हे या पुस्तकातलं सगळ्यात विनोदी विधान वाटलं मला! नायिकेच्या दु:ख़ाचं खापर बाईंनी विवाहसंस्था आणि पुरुषप्रवृत्तीच्या माथी फोडलंय. काही अंशी (दुर्दैवाने) तथ्य उरलंय त्यात अजूनही. पण पुस्तकात कुठेही नायिका आपल्या प्रियकराची(सॉरी, प्रियकरांची) बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत्ये आहे असं दिसलं नाही. आपण स्त्री आहोत याची अति जास्त जाणीव अशा प्रकारच्या लेखनातून दिसते. असो. शैली संमोहित करणारी आहे, स्त्रीने कधी लिहीलं नाही इतकं स्पष्ट लिहीलंय याउपर या पुस्तकात फ़ार काही नाहीये.